कन्याशाळा वाई शताब्दी सांगता समारंभ

कन्या शाळा वाई    23-Aug-2025
Total Views |
कन्याशाळा वाई शताब्दी महोत्सव
सांगता समारंभ – दिनांक १९/०६/२०२५
सन २०२४ ते जून २०२५ हे शैक्षणिक वर्ष महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची कन्याशाळा वाईने शताब्दी वर्ष म्हणून साजरे करताना विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन केले होते.
जून २०२४ रोजी उद्घाटन झालेल्या या शताब्दी महोत्सवाची गुरवार दिनांक १९ जून २०२५ रोजी सांगता करण्यात आली. प्रमुख पाहुणे मा. सौ मेधा कुलकर्णी यांचे संस्थेच्यावतीने व प्रशालेच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. महर्षी अण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व अण्णा व बाया यांच्या प्रतिमेचे पूजन करून आश्रमगीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवीन मराठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. राजश्री शिंदे यांनी केले.शाळेच्या आतापर्यंतच्या प्रवासाची एक चित्रफित दाखवून आठवणींचा ठेवा सर्वांच्या मनात कोरला गेला. यशाच्या शिखरावर विराजमान झालेल्या दोन्ही शाळांचा इतिहास या चित्रफितीतून दाखविण्यात आला. शताब्दी महोत्सवाच्या कार्याध्यक्षा मा. मृणाल वैद्य यांनी मा. सौ मेधा कुलकर्णी यांचा परिचय एक अष्टपैलू व्यक्तिमत्व ,राज्यसभा खासदार,प्रभावशाली नेतृत्व असा करून दिला.
प्रमुख अतिथीचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. रवींद्र देव यांच्या हस्ते करण्यात आला. त्याच बरोबर शाळेतील गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.
भर वर्षांच्या आठवणींचा खजिना असलेल्या स्मरणिकेबद्दलची माहिती मा. सौ उमा जोशी यांनी करून दिली. संस्थेच्या कार्याचा आढावा, संस्थेच्या कार्यकर्तुत्वाचा इतिहास, मान्यवरांच्या शुभेच्छा संदेश समाविष्ट असलेल्या गतस्मृतींना उजाळा देणाऱ्या या अतुल्य खजिन्याचे प्रकाशन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले.
वाई प्रकल्प अध्यक्ष मा. सोनपाटकी यांनी मनोगतातून शाळेच्या स्थापनेच इतिहास, प्रशालेच्या पहिल्या मुख्याध्यापिका, आतापर्यंतच्या आजन्म सेविकांचे कार्य, वाई प्रकल्पातील नऊ शाखांचे कार्य अशा विविध गोष्टींचा उल्लेख केला.
प्रमुख अतिथी सौ मेधा कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून भारताची सक्षमता,शिक्षण यांची माहिती देत या शाळेतून हुशार विद्यार्थिनी घडत असल्याचा उल्लेख केला. निसर्गाची जपणूक करणाऱ्या शाळा, श्रद्धा व विज्ञान यांची मुली देणाऱ्या शाळा आणि शिक्षक यांचे महत्व असे विचार मांडले. राजकीय क्षेत्रातही मुलीनी पदार्पण करावे. असेही सांगितले.
यानंतर मा. रवींद्र देव यांनीही मनोगत व्यक्त केले. सौ मुग्ध वैद्य यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

शताब्दी सांगता समारंभ

                 शताब्दी सांगता समारंभ .                       शताब्दी सांगता समारंभ

शताब्दी सांगता समारंभ