दिनांक २० जून २०२४ रोजी सकाळी दहा वाजता कन्याशाळा वाई शताब्दी महोत्सव व नवीन मराठी शाळा सुवर्ण महोत्सवाचा उद्घाटन सोहळा सत्यवती जोशी सभागृहात मोठ्या दिमाखात संपन्न झाला
सभागृहातील कार्यक्रमापूर्वी सकाळी साडेआठ वाजता ढोल ताशांच्या गजरात तुतारीच्या निनादात कन्याशाळेतून शोभायात्रा निघाली. या शोभायात्रेसाठी महोत्सवाचे अध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष, उपकार्याध्यक्ष, मुख्याध्यापक, आजन्मसेवक, शाला समिती सदस्य, पालक, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
पुण्याचे वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे महाप्रबंधक माननीय डॉक्टर शेखर मांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत शास्त्रज्ञ व गन एक्स्पर्ट म्हणून ओळखले जाणारे माननीय श्री काशिनाथ देवधर हेही उपस्थित होते.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय श्री. देव साहेब सचिव, माननीय श्री. पी. व्ही. शास्त्री साहेब, वाई प्रकल्पाध्यक्ष माननीय श्री. प्रभाकर सोनपटकी, महोत्सवाचे सचिव माननीय सौ. भोये मॅडम, माननीय जाधव मॅडम, आजन्मसेविका माननीय सौ. राव मॅडम, कार्याध्यक्ष माननीय सौ. उमा जोशी, माननीय सौ. मृणाल वैद्य, माननीय डॉक्टर सौ. स्वाती देशपांडे, माननीय सौ रश्मी शेवडे, माननीय सौ मुग्धा वैद्य, उपकार्याध्यक्ष श्रीमती मनीषा देशपांडे, श्रीमती नमिता पाटील, सौ प्राजक्ता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे श्री वैद्य सर आरुणि विद्या मंदिर मुख्याध्यापिका सौ. सातपुते मॅडम, शाळेचे माजी शिक्षक, माजी विद्यार्थिनी, देणगीदार, पालकशिक्षक संघ अध्यक्ष, सदस्य, संस्था सभासद, शिक्षक आदी या कार्यक्रमास उपस्थित होते.
माननीय शेखर मांडे यांनी दीप प्रज्वलन केले. ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेचा इतिहास सांगणारी चित्रफीत उपस्थितांना दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका सौ. भोये मॅडम यांनी केले. नवीन मराठी शाळेची थोडक्यात माहिती सौ जाधव मॅडम यांनी सांगितली. पाहुण्यांचा परिचय आजन्मसेविका राव मॅडम यांनी करून दिला. डॉक्टर स्वाती देशपांडे यांनी कार्याध्यक्ष श्री रविंद्र देव साहेब, सचिव श्री शास्त्री साहेब व अध्यक्ष श्री सोनपाटकी साहेब यांचा परिचय करून दिला.
मा. सोनपाटकी साहेब यांच्या हस्ते श्री मांडे सर यांचा शाल, मोमेंटो व अण्णांचे चरित्र देऊन सत्कार करण्यात आला. महोत्सवाच्या कार्याध्यक्षा सौ. मृणाल वैद्य यांच्या हस्ते श्री. देवधर सर यांचा सत्कार केला गेला.
१०० वर्षात पदार्पण केलेल्या कन्याशाळेचे कौतुक व सन्मान करणारा शुभेच्छा संदेश माजी मुख्याध्यापिका माननीय मालतीताई देशपांडे यांनी पाठवला होता. त्याचे वाचन करण्यात आले. माजी शिक्षिका सुधा करंदीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शाळेला एक लाख रुपयांची देणगी कृतज्ञतापूर्वक दिली. सामाजिक दायित्वाची जाणीव असणारे श्री. आर. व्ही.लढ्ढा यांनी रुपये ५० हजार ची देणगी दिली.
महोत्सवाच्या कार्याध्यक्षा सौ. उमाताई जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्त्री शिक्षणाबाबतची आव्हाने अजूनही संपलेली नाहीत, सर्वांनी निस्वार्थ निरलसपणे व चिकाटीने काम करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय मनोगतात श्री सोनपाटकी साहेबांनी प्रथम सर्वांचे अभिनंदन केले. कार्यक्रम नीटनेटका व यशस्वी होण्यासाठी सगळ्यांनी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी दखल घेतली. वाई सारख्या गावात मुलींच्या शिक्षणास विरोध झाला तरीही अण्णांचे ध्येय आणि शिक्षकांची निष्ठा यामुळे ही संस्था १०० वर्षांची यशस्वी वाटचाल करू शकली असे ते म्हणाले.
प्रमुख पाहुणे डॉक्टर शेखर मांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. महर्षी कर्वे व बाया कर्वे यांनी ज्या काळात स्त्री शिक्षणाचा पाया घातला त्यावेळी गरिबी होती. महिला सबलीकरण नव्हते. विधवांबाबत तर विचारच केला जात नव्हता अशा काळात त्यांनी केलेले कार्य समाजाचा उद्धार करणारे ठरले. लोक उद्धारासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळेच भारत देश प्रगती करू शकला आहे. सन २०१७ मध्ये आपण एक विकसित देश असू. भारताला विकसित करण्याचे हे स्वप्न विद्यार्थ्यांपुढे ठेवा असे ते म्हणाले व शाळेला शुभेच्छा दिल्या.
शिक्षणाबरोबरच संस्कार व सशक्तीकरण हा ध्येयवाद अण्णांनी घेतला. याच ध्येयासोबत आजही संस्था चालू आहे, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री देव साहेब म्हणाले. शहरातील आदिवासी, कातकरी समाजातील महिलांना शिवणकामाचे शिक्षण देऊन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम संस्था करत आहे. संस्थेत सकारात्मक वातावरण आहे. संख्यात्मक वाढीसोबत गुणात्मक वाढ करून सामाजिक बांधिलकी जपत शाळा व संस्था काम करत राहणार आहे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुरेखा जमदाडे व आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका सौ नीता देवी वंजारी यांनी केले.
आश्रम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.